कर्मयोग हा भगवद्गीतेचा मुख्य सिद्धांत आहे जो आपल्याला जीवनात कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्म करण्याची आणि त्या कर्माच्या परिणामाबद्दल चिंता न करण्याची प्रेरणा देतो. कर्म म्हणजे कृती आणि योग म्हणजे ती कृती करण्याची योग्य पद्धत किंवा कला या दोन्ही शब्दांचा मेळ म्हणजेच कर्मयोग.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात कर्मयोगाचे तत्त्वज्ञान आपल्याला मानसिक शांतता आणि यश मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. हे काम मी केले आहे या भावनेतून अहंकार आणि नंतर निराशा निर्माण होते. कर्मयोगी हा विचार करतो की आपण केवळ एक माध्यम आहोत जेव्हा आपण ईश्वराला किंवा निसर्गाला साक्षी ठेवून काम करतो, तेव्हा कामातील ताण कमी होतो आणि कामाचा आनंद घेता येतो.
आपण जे काही काम करत आहोत मग ते नोकरी असो व्यवसाय असो किंवा घरातील कामे असो जर आपण ते पूर्ण समरसतेने व निष्ठेने केले तर ते काम एक प्रकारची पूजा बनते. कर्मयोग आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवतो. जर आपण आपले काम आनंदाने व जबाबदारीने केले तर यश आणि समाधान नक्कीच आपल्या पायाशी येईल. जेव्हा आपण कर्म करतो व फळाची अपेक्षा करत नाही तेव्हा सुख दुःख जय पराजय यात आपण विचलित होत नाही.
